जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशन व ओबेनॉल केमीकल प्रायव्हेट लिमीटेड भुसावळ यांच्या वतीने भुसावळ शहरात ५ नोव्हेंबर रोजी पहिली ‘ओबेनॉली श्री २०२२’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती गुरूवार २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास जिल्हा बॉडीबिल्डर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष मोहन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भुसावळ शहरातील दि कोरोनेशन क्लब गांधी पुतळ्याजवळील मैदानात ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यास्पर्धेत ५१ ते ५५ किलो वजनी गट, ५६ ते ६० किलो वजनी गट, ६१ ते ६५, ६६ ते ७० किलो वजनी गट आणि ७० किलो वजनी असे पाच गटात ही स्पर्धा होणार आहे. यात पाहिल्या पाच विजेत्यांना रोख स्वरूपात बक्षिस देण्यात येणार आहे. असे एकुण पाच गटातील २५ विजेते खेळाडूंना समावेश राहणार आहे. संपुर्ण गटातून एकमेक स्पर्धकाला २१ हजार १ रूपयाचे मोठे पारितोषीक देण्यात येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन चव्हाण, राष्ट्रीय शरीरसौष्ठव खेळाडू सचीन पाटील, युवराज पाटील, अश्विनकुमार परदेशी,हरीश्चंद्र सोनवणे आदींनी केले आहे.