सपाचे आमदार आझम खान यांना तीन वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आणि आमदार आझम खान यांना न्यायालयाने 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षेसह २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आझम खान यांनी एक भाषण केलं होत. याच भाषणात त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद करून घेण्यात आली. त्यानंतर खटला उभा राहिला आणि दोन्ही बाजूंची सुनावणी झाली. त्यावरच न्यायालयाने आज आझम खान यांना दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आझम खान यांना ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला आता आझम खान हे उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.

हे आहे प्रकरण !
चिथावणीखोर भाषणाशी संबंधित हे प्रकरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील आहे. 27 जुलै 2019 रोजी भाजप नेते आकाश सक्सेना यांनी आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आझम खान यांनी रामपूरच्या मिलक विधानसभा मतदारसंघात जनतेला संबोधित करताना चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी आझम खान यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन डीएम यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली.

Protected Content