दोघांची ऑनलाईन फसवणूक : लिंकवर क्लिक करताच खात्यातून पैसे झाले ट्रान्सफर

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अँड्रॉईड मोबाईलवर लिंक पाठवून गिफ्ट मिळेल असे सांगण्यात आल्याने दिलेल्या लिंकवर क्लिक करताच दोन जणांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

१. पहिल्या फिर्यादी (पहिली घटना)

राहुल प्रमोद महाजन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० एप्रिल रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास त्याचे वडील प्रमोद महाजन हे घरी असतांना त्यांना मोबाईलवर  २९५३७२३८५ या क्रमांकावरून अनोळकी व्यक्तीचा फोन आला. फोन उचाल्यावर प्रमोद महाजन यांना समोरील  व्यक्तीने तुम्हाला गीफ्ट मिळणार आहे. तुला लिंक पाठवतो. त्या लिंकवर क्लिक करून तुला गिफ्ट मिळेल, असे सांगितले. प्रमोद महाजन यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांच्या  बँक ऑफ बडोदा शाखेच्या खात्यातून २६ हजार रुपये ऑनलाईन पध्दतीने दुसऱ्या खात्यात वळते  झाले.  फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याबाबत शनिपेठ पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुरेश सपकाळे  हे करीत आहेत.

 

२. दुसरा फिर्यादी (दुसरी घटना )

दुसऱ्या घटनेत लक्ष्मी निलेश राखोंडे यांचे ऑनलाईन फसवणूक झाली आहे. त्या ३० एप्रिल रोजी दोन वाजेच्या सुमारास त्या घरी असताना त्यांना अज्ञात ७०९३६९८७३९ या क्रमांकावरून फोन आला. सौ. राखोंडे यांनी फोन उचल्यावर त्यांना समोरील अज्ञात व्यक्तीने सांगितले की, तुमचे लक्ष्मी किराणा दुकान असून तुम्हाला बिजनेस फोन-पेवर गीफ्ट मिळालेले आहे. मी तुम्हाला पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा. सौ. राखोंडे यांनी लिंकवर क्लिक करताच त्यांची कोटक महेंन्दा कंपनीचे वीजा कार्ड व खात्यातून ३७ हजार ४९५ रुअप्ये ऑनलाईन पध्दतीने सदरची रक्कम ट्रान्सफर करून घेत संबंधित फोनवर बोलणाऱ्याने ऑनलाइन फसवणूक केली.  याप्रकरणी देखील शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सुरेश सपकाळे  हे करीत आहेत.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content