भारत विकास परिषद जळगावर्फे वृक्षारोपण

wruksharopan

जळगाव प्रतिनिधी । येथील भारत विकास परिषद जळगावर्फे 61 वृक्षारोपण करण्यात आले. नगरसेवक आबा कापसे, नगरसेवक मयुर कापसे व शेख यांच्या हस्ते कडू लिंबाचे रोप लावून पर्यावरणाच्या संवर्धन कार्यास सुरूवात करण्यात आली.

‘एक झाड एक कुटुंब’या संकल्पनेनुसार यावर्षी भारत विकास परिषदेच्या सदस्यांनी सहकुटुंब वृक्षारोपणाचे नियोजनानुसार डॉ.योगेश पाटील यांनी सहकुटुंब वृक्षारोपणाला सुरवात केली. याप्रसंगी उद्योजक श्रीराम पाटील, अध्यक्ष प्रसन्न मांडे ,सचिव विशाल चोरडिया, कोषाध्यक्ष चेतन दहाड, शाखा पालक रविंद्र लढा, महिला समन्वयक अनिता नारखेडे, स्थायी प्रकल्पाचे अध्यक्ष पुरुषोत्तम न्याती, श्रीहर्ष खाडीलकर, हमीद मेनन, सचिन चोरडिया, डॉ.धीरज बडाळे, डॉ. विनीत नाईक, सुनील याज्ञिक, विजय मोरे, प्रशांत महाजन, उज्वल चौधरी, सी.ए.नचिकेत जोशी, कुणाल पाटील, दीपक खडके, ज्ञानेश्वर पाटील, भारत पाटील, उमेश पाटील आदींची सहकुटुंब उपस्थिती होती.

Protected Content