नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर येत आहे. त्यांची पिंपळगाव येथे ते जाहीर सभा घेणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील सभेच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला छावणीचे स्वरूप आले आहे. या सभेकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. पिंपळगाव बसवंत येथील सभेअगोदरच लासलगाव येथे शेतकऱ्यांनी आज सकाळी कांद्याच्या माळा घालून कांद्याची संपूर्ण निर्यात बंदी हटवण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले.
यावेळी लासलगाव पोलिसांनी कांद्याच्या माळांसह १५शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. लासलगाव पोलिसांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेणाऱ्या शहर विकास समितीचे काही कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्याची माहिती समोर आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन पाकिस्तानला घाबरत नाही, तर त्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांची भीती आहे का? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना सभेला जाऊ देत नसेल तर मग सभा कशाला घेत आहात? शेतकऱ्यांना विनाकारण पोलिसांकडून त्रास दिला जातोय, असे संदीप जगताप यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांच्या सभेपूर्वी कांद्याच्या माळा गळयात घालून आंदोलन; १५ शेतकऱ्यांना अटक
6 months ago
No Comments