५५ लाखाचे कपडे व दागिने चोरून रील्स वीडिओ बनवले; दोन बहिणींना अटक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईमध्ये दोन तरूणींनी इंस्टाग्रामवर रील्स बनवण्यासाठी एका वृध्द दाम्पत्याच्या घरून ५५ लाख रूपयांचे दागिने, महागडे कपडे आणि इतर मौल्यवान सामनांची चोरी केल्याची घटना घडली आहे. या दोनही तरूणी बहिणी आहेत. त्यापैकी एकीचे नाव छाया वेतकोळी असून २४ वर्षांची आहे तर दुसरीचे नाव भारती वेतकाळी असून ती २१ वर्षांची आहे. पोलिसांनी त्यांना चोरलेले कपडे आणि दागिने परिधान करून रील वीडिओ बघून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध दाम्पत्याला घरातील मौल्यवान दागिने आणि कपडे गायब झाले होते. हे कळताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. दोन बहिणी या वृध्द दाम्पत्याच्या घरी काम करायच्या. याप्रकरणी अधिक तपास केला असता पोलिसांच्या निदर्शनास आले की त्या दोघी बहिणी नेहमी दाम्पत्याच्या घरातील दागिने आणि कपडे परिधान करून रील्स अपलोड करायच्या. पोलिसांनी आधी वृद्ध दाम्पत्याकडून दागिने आणि कपड्यांची ओळख पटवून घेतली. त्यानंतर दोघी बहिणींचं लोकेशन ट्रेस केल्यावर त्या रायगडमध्ये असल्याचं समजले असता पोलिसांनी त्यांना रायगडमधून अटक केली. त्यांनी ५५ लाख रूपयांचे दागिने आणि कपडे जप्त केले.

Protected Content