सोनवद येथे एकाला लाकडी काठीने मारहाण; धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।धरणगाव तालुक्यातील सोनवद गावातील शेतकी संघाच्या गोडाऊन येथील चोरी करतांना एका तरूणाला पकडून लाकडाने बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरूवार २५ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे याप्रकरणी रात्री १० वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, चेतन पावरा रा. पष्टाणे ता. धरणगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील शेतकी संघाच्या गोडाऊनजवळ काहीतरी वस्तू चोरी करताना त्याला पकडले. त्यावेळी समद शरीफ पठाण वय-४२, रा. साळवा ता. धरणगाव याने लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याचे काका वकील मेठा पावरा वय-२९ यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणारा समद शरीफ पठाण वय-४२, याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र कोळी हे करीत आहे.

Protected Content