पैसे देवूनही कार मिळेना; एकाची साडेसात लाखांची फसवणूक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सेकंड हॅण्ड कार खरेदीच्या करण्याच्या मोबदल्यात मेहरूण येथे अल्ताफ बेग शमशेर बेग मिर्जा यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपयांची रोकड घेतली. परंतु त्यांना अद्याप पर्यंत कार न देता त्यांची फसवणुक केल्या घटना गुरूवारी २५ एप्रिल रोजी उघडकीस आली. याप्रकरणी दुपारी १ वाजता दीपक संजयराव देशमुख (रा. श्रीकृष्ण कॉलनी) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील मेहरुण परिसरात असलेल्या हाजी अहेमद नगरातील रहिवासी अल्ताफ बेग शमशेर बेग मिर्झा (वय- ४५) यांनी नोव्हेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ रोजी दरम्यान, ते मुंबई येथील एका बॅकेकडून मोठ्या प्रमाणात सेकंड हॅण्ड कार खरेदी करणार होते. त्यासाठी दीपक संजयराव देशमुख यांनी अल्ताफ बेग यांचा विश्वास संपादन करुन त्यांनी त्यापोटी त्यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये घेतले होते. परंतु अद्यापपर्यंत त्यांना एकही सेंकड हॅण्ड कार दिली नाही. अल्ताफ बेग मिर्जा यांनी देशमुख यांच्याकडे कार देण्याची मागणी केली असता, त्यांनी शिवीगाळ करीत “तुझ्याने जे होईल ते करुन घे” असा दम दिला. त्यामुळे मिर्जा यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर संशयित दीपक संजयराव देशमुख यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जाधव हे करीत आहे.

Protected Content