जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माझ्याकडे का पाहतो याचा जाब विचारल्यावरून तरूणाला तीन जणांनी फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोहेल खान मुबारक खान (वय-२१) रा. गेंदालाल मील, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवार २० मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सोहेल खान हा शहरातील काँग्रेस भवन कार्यालयासमोरील बाजुच्या गल्लीत उभा असतांना समाधान, भारत आणि इतर अज्ञात तीन जणांनी त्यांच्याकडे पाहत होते. यावर माझ्याकडे का पाहतात असा जाब सोहेल खान याने विचारले असता समाधान, भारत आणि इतर अज्ञात तीन जणांनी शिवीगाळ करून फायटरने बेदम मारहाण करून सोहेलला गंभीर जखमी केले. याबाबत सोहेल खान याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री १० वाजता संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.