जळगावात महिलेचा विनयभंग; दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात महिलेच्या घराचे बांधकामाच्या ठिकाणी शेजारी राहणाऱ्या दोन जणांनी किरकोळ कारणावरून महिलेचा विनयभंग करून झटापट केल्याचा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी उघडकीला आला. त्यात महिलेला चक्कर आल्याने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचार घेतल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून आज सोमवारी ११ ऑक्टोंबर रोजी रामानंद पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील एका भागात राहणारी महिलेच्या घराचे बांधकाम एका भागात सुरू आहे. त्या ठिकाणी त्यांच्या शेजारी राहणारे राजेश पांगे यांचे पाळीव कुत्र्याने त्यांच्या बांधकामाच्या ठिकाणी घाण केली होती. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महिला बांधकामाच्या ठिकाणी आल्या व त्यांना घाण दिसल्याने शेजारी राहणारे राजेश पागे यांना जाब विचारला. याचा राग आल्याने राजेश पागे व अनिकेत सोनवणे यांनी यांनी अश्लिल शिवीगाळ करून महिलेचा विनयभंग केला. यात झटापट देखील झाली. त्यामुळे त्या चक्कर येवून खाली पडल्या. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.  उपचार घेतल्यानंतर आज सोमवार ११ ऑक्टोबर रोजी महिलेने रामानंद पोलीस ठाणे गाठले. महिलेच्या फिर्यादीवरून राजेश पागे व अनिकेत सोनवणे  या दोघांवर  रामानंद पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील करीत आहे.

 

Protected Content