पाचोऱ्यातील पत्रकाराचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यु

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा येथील भडगाव रोडवरील दत्त कॉलनी परिसरातील रहिवासी व “पोलीस आजतक” या साप्ताहिकाचे संपादक प्रविण (बाबा) दिवटे (वय – ४५) यांचे दि. १७ रोजी गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान नाशिकरोड येथे रेल्वेच्या धक्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रविण (बाबा) दिवटे (वय – ४५)  असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्रविण दिवटे हे गेल्या आठ दिवसांपूर्वी नाशिक येथे आपल्या कुटूंबियासह वास्तव्यास गेले होते. यांचे पश्चात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार असून त्यांचे मृत्यूप्रकरणी नाशिक येथील रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचेवर आज दि. १८ फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पाचोरा येथील बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक रामजी धनजी दिवटे यांचे मोठे चिरंजीव व युनियन बँकचे कर्मचारी संदिप दिवटे यांचे मोठे बंधू होत.

 

Protected Content