रेल्वेखाली झोकून एकाची आत्महत्या

Crime

भडगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कजगाव येथे रेल्वे स्टेशनपासून जवळ असलेल्या रेल्वे पटरीजवळ अज्ञात इसमाने धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान आत्महत्या करण्यापुर्वी मोटारसायकल रेल्वे पटरीच्या बाजूला लावलेली आढळून आली.

 

घटना घडल्यानंतर परीसरात नागरीकांना बघ्याची भूमीका घेतली होती. सदर घटनेची माहिती नागरीकांना पोलीस आणि रेल्वे प्रशासनाला देण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या इसमाच्या अद्याप ओळख पटलेली नाही. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली आहे.

Add Comment

Protected Content