गुरांची कोंबून वाहतूक : परस्पर विरोधी गुन्हे दाखल

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुरांची कोंबून वाहतूक केल्याच्या प्रकरणात येथील पोलीस स्थानकात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

येथील पोलीस स्थानकात जयेश चौधरी यांनी फिर्याद दाखल केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, एमएच १९ सीवाय २७३८ क्रमांकाच्या वाहनातून गुरांची कोंबून वाहतूक करण्यात येत असल्याचे आपल्याला दिसून आले. यातच गाडीचा चालक शेख इसाक गुलाब याने आपल्यासह माझ्यासोबत असणारे मित्र लोकेश चव्हाण यांना धमकी दिली. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, यासोबत शेख इसाक गुलाब यांनी देखील बोदवड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, जयेश चौधरी व लोकेश चव्हाण यांनी जनावरांची वाहतूक करत असताना गाडी अडवून गाडी सोडून देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली व पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच या दोघांनी मारहाण करत बळजबरीने चार हजार रुपये काढून घेतले. या अनुषंगाने बोदवड पोलीस स्थानकात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Protected Content