भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मधुबन हॉटेल परिसरात ‘मेथाक्वालोन’ ड्रग्ज विक्रीच्या उद्देशाने घेवून फिरणाऱ्या बाजारपेठ पोलिसांनी दोन जणांना राष्ट्रीय महामार्ग ५३ वर अटक केली होती. या कारवाईत तब्बल ७३ लाखाचे मेथाक्वालोन जप्त करण्यात आले आहे. यात आता मेथाक्वालोन पुरविणाऱ्या अजून एकाला पोलीसांच्या ताब्यात आले आहे.
विभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघम व इतर सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर असलेल्या हॉटेल मधुबन जवळ दोन जणांना संशयितरित्या फिरत असताना अटक केली. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ९१० ग्रॅम मेथाक्वालोन ज्याची किंमत ७२ लाख ८० हजार रुपये इतकी आहे. तो जप्त करण्यात आला. मेथाक्वालोन साठा व २० हजार किमतीचे दोन मोबाईल जप्त केले. संशयित आरोपी कुणाल भरत तिवारी (रा. तापी नगर, भुसावळ), जोसेफ जॉन वाडाल्यारेस (रा.कंटेनर यार्ड भुसावळ) या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा अधिक तपास करता जप्त गुंगीकारक मेथाकवालेन नावाचा मानवी जिवीतास अपायकारक अमली पदार्थ हे यातील तिसरा संशयित आरोपी दिपेश मुकेश मालवीय (रा. शेर ए पंजाब हॉटेल, वरणगाव रोड भुसावळ) याने विक्री करीता पुरवली आहेत असे तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाय हे ड्रग्ज मुंबईतून आणण्यात आल्याचे समोर आल्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने मुंबईतून एकाला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, तिन्ही संशयितांना अटक केली असून भुसावळ न्यायालयात हजर केले असता आरोपींची २ दिवस पोलीस कोठडी प्राप्त करण्यात आली आहे. गुन्हाचा तपास पो.उपनि. मंगेश जाधव व पोकॉ/1653 योगेश महाजन असे मिळुन करीत आहे. स्वतंत्र पथकामार्फत इतर संशयित आरोपीचा शोध सुरु आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पो.नि. गजानन पडघन, पोउनि मंगेश जाधव यांच्यासह पोहेकॉ विजय नेरकर, निलेश चौधरी, पोहेकॉ रमण सुरळकर, पोहेकॉ यासीन पिंजारी, पोहेकॉ चौधरी, पोकॉ प्रशांत सोनार, सचिन चौधरी, योगेश महाजन, परदेशी, जावेद शाह, पोकों राहुल वानखेडे, भुषण चौधरी, आढाळे, यांनी ही कारवाई केली आहे.