बोलण्याचा बहाणा करून मोबाईल लांबविणाऱ्या संशयिताला अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बामणोद गावात मोबाईलवर बोलण्याचा बहाना करत तरुणाचा मोबाईल लांबविण्याची घटना १४ मार्च रोजी घडली होती. गुन्ह्यातील संशयित आरोपी जफ्फर राजू शेख वय-३४ रा. जामनेर याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार २० मार्च रोजी सकाळी १० वाजता जामनेर शहरातील जुना बोदवड नाका येथून अटक केली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील बामणोद येथे शुभम गणेश सोनवणे हा तरूण १४ मार्च रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी असताना त्याला संशयित आरोपी जफ्फर शेख भेटला. मोबाईलवर बोलण्याचे कारण दाखवत त्याने तरूणाचा मोबाईल घेवून पसार झाला होता. याबाबत परिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार आरोपी हा जामनेर शहरात असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोहेकॉ महेश महाजन, किशोर राठोड, रणजीत जाधव, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर यांनी संशयित आरोपी जफ्फर राजू शेख याला जामनेर शहरातील जुना बोदवड बुधवार नाका येथून बुधवार २० मार्च रोजी सकाळी १० वाजता अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. त्याला पुढील कारवाईसाठी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content