बिहारचे ज्येष्ठ नेते पप्पू यादव यांनी काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करून केला प्रवेश

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बिहारमधील जनअधिकार पक्षाचे प्रमुख पप्पू यादव यांनी त्यांच्या पक्षाला काँग्रेसमध्ये विलीन करून स्वत: काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ते काँग्रेस पक्षाकडून पूर्णियामधून लोकसभा निवडणूक लढवू शकतात. ते या आधी तीन वेळा पूर्णीयामधूनच खासदार झाले आहे. पप्पू यादव एकदा आमदार आणि पाच वेळा खासदार झाले आहेत. बिहारचे काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश यांनी पप्पू यादव यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. दिल्लीत पत्रकार परिषदेत हा विलीनीकरण करण्यात आला. काँग्रेसने याला ऐतिहासिक विलीनीकरण म्हटले आहे. यावेळी बिहार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते डॉ. शकील अहमद खान,बिहारचे काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश आणि पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक यादव उपस्थित होते.

पप्पू यादव यांनी राजकारणाची सुरूवात लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षातून केली होती. पण २०१५ मध्ये त्यांनी आपला स्वत:चा जनअधिकार पक्ष स्थापन केला होता. मात्र आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पत्नी रणजीत रंजन राज्यसभा सदस्य आहेत. काँग्रेसने त्यांना छत्तीसगडमधून राज्यसभेवर पाठवले होते. पप्पू यादव पक्षप्रवेशानंतर म्हणाले की, निवडणुकीने मला काही फरक पडत नाही. भाजपला रोखणे हा माझा उद्देश आहे. गेल्या १७ महिन्यांत तेजस्वीजींनी जो विश्वास मिळवला आहे, तो लक्षात घेऊन, २४ आणि २५ मध्येही आम्हाला एकत्र राहायचे आहे.

Protected Content