यावल तालुका बनला सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे माहेरघर

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यात सर्वत्र हातभट्टीची गावठी व मानवी जिवनास अत्यंत धोकादायक असणारी पन्नीच्या दारूची सर्रासपणे विक्री केली जात असुन, या अवैध दारूच्या विक्रीमुळे शासनाचे लाखो रूपयांचे महसुल कर बुडीत असुन, दारू व्यसनाधीन होऊन अनेकाचे जीवन उद्धवस्त होत आहे, या नागरिकांच्या अत्यंत आयुष्याशी निगडित प्रश्नाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे .

यावल तालुका हा अवैधांचे माहेरघर बनला असुन, सट्टा मटका घेणाऱ्यांनी ठिकठिकाणी दुकाने उघडली असुन, गावा गावातील गल्ली बोळातील दुकानांपासुन तर सार्वजनिक ठिकाणी खुलेआम विमल गुटखा विक्री केला जात आहे या शिवाय जुगारीचे अड्डे व हातभट्टीची गावठी आणि धोकादायक रसायन मिश्रीत पन्नीच्या दारूची सर्रासपणे विक्री होत असल्याने या अवैध धंद्याकडे अगदी अल्पवयीन शाळकरी मुलांपासुन तर मोलमजुरी करुन आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणारे मजुरवर्ग या अवैध धंद्यांना आकर्षित होऊन व्यसनाधीन झाले आहे. विशेष म्हणजे यावल तालुक्यातील अनेक गावातील तरुणांचे जीवन व कुटुंब या दारूच्या व्यसनामुळे उद्धवस्त झाले असुन या पार्श्वभुमीवर परसाडे, कोरपावली, सांगवी, डोंगर कठोरा, दहिगाव, सावखेडा सिमसह अनेक गावातील ग्राम पंचायतीने महिलांच्या मागणी वरुन गावातील ग्रामसभेत ठराव करीत गावात विक्री होणाऱ्या अवैध हातभट्टीच्या गावठी दारूबंदीच्या निर्णयाची मागणी पोलीस प्रशासनाकडे अनेक वेळा केली आहे, असे असतांना देखील अद्याप पावेतो प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करीत अवैद्य मार्गाने होणारी दारूची विक्री बंद झाल्याचे दिसुन येत नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर महिला वर्गात मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

या सर्व विषयाकडे वरिष्ठ पातळीवर प्रशासनाने योग्य प्रकारे या सर्व अवैध धंद्यांकडे लक्ष केंद्रीत करून ही अवैद्यधंदे बंद करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी तालुक्यातुन महीला वर्गातुन होत आहे .

Protected Content