Home Cities एरंडोल विखरण येथे शेतकऱ्याच्या घरातून रोकड लांबविली; पारोळा पोलीसात गुन्हा

विखरण येथे शेतकऱ्याच्या घरातून रोकड लांबविली; पारोळा पोलीसात गुन्हा

0
38


एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील विखरण येथील शेतकऱ्याचे बंद घर फोडून घरातील २ लाख १५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीला आली आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, अशोक चिंधू महाजन (वय-४२) रा. विखरण ता. एरंडोल जि. जळगाव हे शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. १७ फेब्रुवारी दुपारी २ ते ३.४५ वाजेच्या दरम्यान कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाची कडी उघडून घरात ठेवलेले कपाटाचे लॉक तोडले. कपाटातील २ लाख १५ हजार रूपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि तुषार देवरे करीत आहे. 


Protected Content

Play sound