दुचाकी झाडावर आदळून एक ठार, दोन जखमी

0

( मयत शेख अजीम शेख सैफोद्दीन)

यावल प्रतिनिधी । यावल-भुसावळ रोडवर मोटारसायकल निंबाच्या झाडावर आदळल्याने एक युवक ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत माहिती अशी की, शेख अजीम शेख सैफोद्दीन ( वय २८, रा. अडावद, ता. चोपडा ) हा तरूण भुसावळ येथे मामाकडे जात होता. दरम्यान, यावल शहराजवळच्या टी पॉइंटजवळ यावल येथे राहणारे रईस गुलाम रसुल (वय ३० वर्ष ) व कलीम शेख बशीर (वय३० वर्ष रा. रावेर) या दोघा बांधकाम मजुरांनी निमगाव येथे जाण्यासाठी त्याला हात दिला. यानंतर त्याच्या मोटारसायकलवरून हे तिघे भुसावळ रोडवरून निमगावकडे निघाले. दरम्यान, शहरापासुन एक किलो मिटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्र-गुजरात ढाब्या समोर यांच्या मोटर सायकलीचे चाक फुटल्याने यावर नियंत्रण सुटून ही दुचाकी निंबाच्या झाडावर आदळली. यामुळे शेख अजीम शेख सैफोद्दीन हा जागेवरच मरण पावला असुन रईस गुलाम रसुल व शेख कलीम शेख बशीर हे या भिषण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्यांवर ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी दीपाली भोळे, आरती कोल्हे, चिंटु बागुल यांनी प्रथमोपचार करून त्यांना तात्काळ जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा
Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!