पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कजगाव येथे लघुशंकेसाठी गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल पांडुरंग सोनवणे (वय-४५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. २७ मे रोजी रात्री ११:३० वाजेच्या दरम्यान लघूशंकेसाठी गेले असतांना हमसफर एक्स्प्रेसचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सोनवणे हे अविवाहित असून त्यांचे रेल्वे पटरीला लागून घर असल्याने रात्री झोपेतून उठून लघुशंकेसाठी आल्याने त्यांना रेल्वेची धडक लागली. घटनेप्रकरणी पाचोरा येथील रेल्वे दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर बोरुडे हे तपास करीत आहेत. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. अनिल सोनवणे यांचे पाच्छात आई, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.