महसूल पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणारे डम्पर घेतले ताब्यात

 

भडगाव, प्रतिनिधी । तालुक्यात व शहरातील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. याबाबत भडगाव महसूल विभागाने वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम उघडली असून यात एक डम्पर ताब्यात घेतले आहे. 

मध्यरात्री तालुक्यातील कनाशी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या  डम्पर हे भडगाव महसूल विभागाच्या पथकाने पकडले आहे.डम्पर हे शासकीय विश्राम गृहात जमा करण्यात आले असल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. तालुक्यातील कनाशी येथे वाळूची अवैध वाहतूक करणारे डम्पर  क्र. एम. एच.१७. बी. वाय.५९६९ हे कजगाव च्या दिशेने जात असताना महसूल विभागाचे पथक कजगाव मंडळ अधिकारी राजू शेजवळकर, तलाठी व्ही. सी. पाटील, तलाठी व्ही. पी. शिंदे, तलाठी आर. सी. माने, कजगाव कोतवाल नितीन मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. डम्पर  शासकीय विश्रागृह आवारात जमा करण्यात आले असून यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पथकाने सांगितले.

 

 

Protected Content