जळगाव प्रतिनिधी । पाण्याच्या टँकरखाली आल्याने तालुक्यातील असोदा येथील येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
धनराज जनार्दन सरोदे यांच्या मालकीचे उदय वाँटर सप्लायर्सचे पाण्याचे टँकर शनिवारी दुपारी असोदा गावात पाणी पोहोचविण्यासाठी आलेले होते. बसस्थानक परिसरात हे टँकर आले असता तेथून जात असलेल्या माधव तोताराम पाटील( ५२रा. ढंढोरे नगर, असोदा) यांना चालकाने जोरदार धडक दिली. यात ते मागील चाकाखाली आले. त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने ते जागीच गतप्राण झाले. दरम्यान, चालक तेथून पसार झाला. दरम्यान , माधव पाटील हे एका हॉटेलमध्ये कारागीर होते. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.