जेष्ठ पत्रकार गजानन सूर्यवंशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत

 

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधी । सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील प्रश्नांना लेखणितुन न्याय मिळवुन देत पत्रकारीतेतील चाळीस वर्षांच्या उत्कृष्ठ कामगीरीबद्दल येथिल ज्येष्ठ पत्रकार तथा सेवानिवृत्त ग्रंथपाल गजानन सुर्यवंशी यांना जळगाव येथिल सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या राजनंदीनी फाउंडेशन तर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

धी शेंदुर्णी सेकं. एज्यु. को. ऑप. सोसायटीच्या  कार्यालयाच्या प्रांगणात फिजीकल डिस्टंसचे पालन करून पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे नवनिर्वाचीत कार्याध्यक्ष सतीशराव काशीद होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे सचिव सागरमल जैन, नवनिर्वाचीत महिला सदस्या सौ. उज्वला काशिद, राजनंदिनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. संदीपा ज्ञानेश्वर वाघ, गरुड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर पाटील, सुमित पाटील, कैलास देशमुख, ज्ञानेश्वर वाघ, पत्रकार दिपक जाधव, गोविंद सुर्यवंशी, तुषार गरूड, मयुर झंवर आदी मान्यवर उपस्थीत होते.

यावेळी राजनंदीनी फाऊंडेशन तर्फे सन्मानपत्र, शाल श्रीफळ देऊन श्री सुर्यवंशी यांना सन्मानीत करण्यात आले. तर नवनिर्वाचीत कार्याध्यक्ष सतिषराव काशीद, महिला सदस्या सौ.उज्वला काशिद, कैलास देशमुख यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर श्री . सुर्यवंशी यांना सन्मान मिळाल्या बद्यल संस्थेचे चेअरमन संजय गरूड, सहसचिव दीपक गरुड, जिप सदस्या सौ.सरोजीनीताई गरूड, माजी मुख्याध्यापक एस बी पाटील सर आदींनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. प्रशांत देशमुख सरांनी केले तर आभार दिग्विजय सूर्यवंशी यांनी मानले.

Protected Content