करगाव येथील तरूणाची आत्महत्या

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील करगांव तांडा क्रमांक तीन येथील २२ वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील करगांव तांडा क्र.३ येथील प्रविण नारायण जाधव (वय-२२) रा. करगांव तांडा क्र.३ ता. चाळीसगाव याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवार रोजी रात्री ८:१५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.  या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचे नातलग  अरविंद नारायण जाधव यांनी प्रवीण जाधव यास  ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

 

Protected Content