पारोळा, प्रतिनिधी | एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात आज सोमवार दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान झाले. मतदारांमध्ये उत्साह पाहण्यास मिळाला. यात तरुणांना सोबत शंभर वर्षाच्या आजी यांनी देखील मतदानाचा हक्क बाजावला.
मतदानाला कर्तव्य समजून शंभर वर्षाच्या आजीबाई यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. या आजीबाई यांचे नाव रेशम आहे. त्यांचा मतदानाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मतदानाच्या वेळेस पावसाने जोर पकडल्यामुळे मतदानात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे सकाळचे मतदान धीम्या पद्धतीने होऊन दुपारी तीन वाजेनंतर मतदानास वेग आला. पारोळा तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा याच प्रकारे मतदान झाले. काही किरकोळ गोष्टी वगळता मतदान अगदी शांततेत पार पडले. मतदानादरम्यान एन.एस. बॉईज हायस्कूल च्या ८७ नंबरच्या खोलीत व्हीव्हीएम मशीन बंद पडले होते .ते बदलण्यास दहा ते पंधरा मिनिटं लागले. ते बंद पडण्याच्या अगोदर त्यात दोन मतदान झाले होते. त्यानंतर मतदान सुरळीत सुरु झाले. या मतदारसंघात एकूण २ लाख ७९ हजार ५५७ मतदार असून पुरुष मतदार एक लाख ४४ हजार ६३९ व श्री मतदार एक लाख ३४ हजार ९१६ तृतीयपंथी २ असे एकूण दोन लाख लाख ७९ हजार ५२७ मतदार या मतदारसंघात आहेत. त्यापैकी ८ हजार ५२४पुरुष मतदार व ७८ हजार ४२६ महिला मतदार असे एकूण १ लाख ५८ हजार ९५० मतदारांनी पाचवाजेपर्यंत मतदान केले. पाच वाजेची टक्केवारी ५६.८६ अशी आहे.