फैजपूर शहरात ६४.९० टक्के मतदान

voting symbol

फैजपूर, प्रतिनिधी | रावेर विधानसभा निवडणुकीसाठी फैजपूर येथे ६४.९० टक्के मतदान झाले. सकाळ पासूनच शहरात सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

 

शहरात एकूण १९ मतदान केंद्रे होती तर मतदारसंख्या एकूण २४०३१ एवढी होती त्या पैकी १५५९७ एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते, तरीही नागरिकांनी सुरुवातीपासूनच सर्व मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. सर्वत्र अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रियेदरम्यान शहरातील बूथ क्रमांक २१५ व २२२ वरील व्ही.व्ही. पॅट मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन ते बदलवण्यात आले व मतदान प्रक्रिया पूर्वरत सुरु करण्यात आली.

Protected Content