पोलीस हवालदाराने मानधन दिले शाळेच्या विदयार्थांना मिठाईसाठी

havaldar madat

पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील शेळावे धाबे  येथील मतदान केंद्र क्र. १५ मध्ये विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तासाठी नेमलेल्या मुंबई येथील पोलिस शिपाई योगेश भाऊराव कुणबी (क्र.१७०४१३) यांनी आपणास बंदोबस्ताबद्दल मिळालेले मानधन गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त मिठाई खाण्यासाठी भेट दिले आहे.

 

मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मनवंतराव साळुंखे, पोलिस पाटील राहुल नांदडेकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष युवराज भिल , रविंद्र भिल पारोळा तालुका अध्यक्ष आदिवासी भिल्ल सेना, अशोक भिल ग्रामपंचायत सदस्य यांनी सगळ्यांची दोन दिवस उत्तम व्यवस्था ठेवली. तसेच शाळेतील शिक्षक मनवंतराव साळुंखे व वरीष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील हे शाळेत उत्कृष्ट अध्यापन कार्य करीत असुन विदयार्थी व गावाची उत्तम प्रकारे सेवा करीत आहेत. याबाबत त्यांना ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्याने त्यांनी स्वयंस्फुर्तीने आपले निवडणुकीसाठी मिळालेले मानधन ८०० रुपयात स्वतःकडचे ३०० रुपये टाकुन ११०० रुपये शाळेच्या आदिवासी विदयार्थ्यांना दिवाळीत मिठाई घेण्यासाठी मुख्याध्यापक साळुंखे यांच्याकडे दिले.

यावेळी मतदान केंद्राध्यक्ष शेख इकबाल नुर मुहंमद, अंग्लो उर्दू हायस्कुल पाचोरा, संदीप गुलाले, सुक्ष्म निरीक्षक, युनियन बँक जळगाव, वसंत रमेश पाटील, व्हीडीओ ग्रॉफर एफ.एस.टी. पथक अमळनेर, जे.डी. पठाण, क्षेत्र अधिकारी पी.डब्लु.डी. शाखा अभियंता अमळनेर , पाळणा घर संचालिका अंगणवाडी सेविका सुलोचना पाटील उपस्थित होते. यावेळीही येथे ९० टक्के पेक्षा जास्त मतदान होऊन उच्चांक झाला आहे.

Protected Content