जळगावातील गुरूवर्य प.वी.पाटील विद्यालयात पालकसभा ऑनलाईन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसह पालकांच्या ऑनलाईन पालकसभा घेण्यात आल्या.

ऑनलाईन सभेत विद्यार्थ्यांना दररोज शिकवल्या जाणाऱ्या घटकांची माहिती देत प्रात्यक्षिकाद्वारे अभ्यास कसा केला जातो याविषयी मार्गदर्शन केले. पालकांनी आपल्या पाल्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे व त्यांना अभ्यासात मदत करावे, अभ्यासासोबतच इतर पारंपारिक खेळ जसेकी लगोरी विटी-दांडू यासारखे खेळ विद्यार्थ्यांनी खेळावे व त्यांना ते खेळ खेळण्यास पालकांनी प्रवृत्त करावे याबद्दल सांगण्यात आले .त्याचबरोबर आपण दररोज जी फळे खातो त्या फळांच्या बिया साठवून त्या बिया आपल्या अंगणात कुठेतरी लावून त्या रूपाचे निरीक्षण करण्यास सांगण्यात आले. अभ्यासासोबतच कला शिक्षणाचे वाव मिळावा म्हणून छोट्या-छोट्या कृती करण्यास त्यांना मार्गदर्शन करावे.विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आपणास काही सूचना द्यायच्या असतील तर त्या सूचना शिक्षकांना द्याव्या म्हणून बोलण्यात आले.

पालक सभेचे आयोजन मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले प्रसंगी शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी उपस्थित होते.

Protected Content