कोरोना : जिल्ह्यात नव्याने २ बाधित रूग्ण आढळले

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरा २ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात चोपडा तालुक्यातून दोन बाधित रूग्ण आढळले आहे. तर एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. जिल्ह्यात आता ९ ॲक्टीव्ह रूग्ण असून उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८१७ रूग्ण बाधित आढळून आले आहे.त्यापैकी १ लाख ४० हजार २२९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ५७९ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिला आहे.

 

Protected Content