यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील शेतकऱ्याचा तोल जावून विहिरीत पडल्यानू पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय रामदास पाटील (वय-५०) रा. किनगाव ता. यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रूईखेडा शिवारात त्यांचे शेत असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार १६ जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास शेतात काम करत होते. त्यानंतर ते विहिरीजवळ आले. त्यांनी आत डोकावून पाहिले असता त्यांचा तोड गेल्याने त्याच्या विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. संजय पाटील हे विहिरीत पडल्याचे पाहून नातेवाईकांनी ओरडाओरड केली. तरूणांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. ललित विठ्ठल पाटील (वय-५२) रा. दहीगाव ता. यावल यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र बागुले करीत आहे.