रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील आहीरवाडी येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा विहीरीत पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कांतीलाल उर्फ चंद्रकांत यादव सावळे वय ४२ रा. अहीरवाडी ता,रावेर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, कांतीला सावळे हे आपल्या परिवारासह अहीरवाडी गावात वास्तव्याला होतो. मंगळवारी ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी शौचासाठी ते शेतातील विहिरीजवळून पायी जात असतांना त्यांचा पाय घसरला. त्यामुळे ते विहिरीत पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान गावातील ग्रामस्थांनी धाव घेवून काही तरूणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. रावेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.