युवानेते धनंजय चौधरी यांच्या कृतज्ञता दौऱ्यात ग्रामस्थांशी सांधला संवाद

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । युवा नेते धनंजय चौधरी यांनी आदिवासी भागातील गारबर्डी, निमड्या, गारखेडा, पाल येथे कृतज्ञता दौऱ्यांच्या निमित्ताने ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी प्रत्ये गावात जावून जलपूजन करण्यात आले. यावेळी धनंजय चौधरी यांच्या पाठीमागे असल्याचं आश्वासन येथील ग्रामस्थांनी दिले आहे.

धरणांच्या शृंखलेंनी बहरलेल्या सातपुडा परिसरातील हे प्रमुख धरण असलेले ठिकाणी स्व. बाळासाहेब यांनी अहोरात्र कार्य करून सुकी धरण 1971 साली बांधले. याभागातील आदिवासी तडवी पावरा बंजारा समाजाच्या लोकांना रोजगार मिळाला व हजारो हेक्टर जमीन ही सिंचनाखाली गेली. त्यामुळे शेतकऱ्याचे जीवनमान उंचावले. कामांसाठी आलेले मजुरांनी त्याच भागात वस्ती व वाडे बाधून रहिवास केला. या लोकांना रहिवासाच्या वीज पाणी रस्ते इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या.

या गावचे सरपंच रतन बारेला म्हणाले की, चौधरी साहेबाची पीढी गेल्या ८०पेक्षा जास्त वर्षापासून गरीब व आदिवासी लोकसाठी काम करत आहे. त्यांच्यामुळे आपल्याला रहिवासी सोय व उपजीविकेचे साधन निर्माण झाले आहे. त्यांचे उपकार आमच्याने फिटणार नाही. व आम्ही सर्व धनंजय चौधरी यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय आमदार शिरीषदादा चौधरी यांनी गावातील सिमेंट रस्ते, गटारी, पेव्हर ब्लॉक, वीज, सोलर लॅम्प अशी भरीव कामे केलेली आहे. त्याबद्दल गावकऱ्यांनी दादा प्रती आदर भावना व्यक्त केली..

याप्रसंगी जलपूजन सरपंच रतनसिंग बारेला यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासोबत ग्यांनसिंग बारेला, धीरज शिवराम भिलाल, लालसिंग भिलाला, महावीर भिलाला, गणेश भीलाला, राजू भिलाला, धनसिंग भिलाला, भूनसिंग बरेला, पार्तींग पावरा, शामराव बारेला, जुवानसिंग बारेला, दिनेश पावरा पोलिस पाटील, गोपाल पावरा, रूपसिंग पावरा, नवल सिंग वेठा, नानभाया पावरा इत्यादी उपस्थित होते.

तर निमड्या आणि गारखेडा या पाल ता. रावेर येथून जवळ असलेल्या या गावात कै.मधुकरराव चौधरी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन गावाच्या विकासात हातभार लावलेला आहे.
बहुसंख्य आदिवासी समाज असलेल्या या गावात आज ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन आणि वृक्षरोपण करून कृतज्ञता यात्रेस सुरवात करण्यात आली. या गावासाठी सिमेंट रस्ता, पेव्हर ब्लॉक, गटारी, तसेच जलजिवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी, पाइपलाइन व ग्रामपंचायत बिल्डिंग चे बांधकाम अशी भरीव कामे दादा मार्फत करण्यात आलेली आहे. तसेच आज झालेल्या ग्रामस्थांच्या चर्चेदरम्यान दोन्ही गावात बंद असलेली बससेवा बस आगर सोबत चर्चा करून बस सेवा सुरू करण्यात आली. याप्रसंगी गावात तरुण ग्रामस्थांचे उपस्थिती लक्षणीय होती.

गारखेडा येथे धनंजयभाऊ आले असता आले असता येथील पावरी आदिवासींनी धनंजय भाऊचे स्वागत केले व त्यांचे पारंपारिक तीरकामठ्याचे प्रात्यक्षिक दाखविले याप्रसंगी धनंजय यांनी सुद्धा प्रात्यक्षिक करून पाहिले दादांनी घेतलेल्या सहभागामुळे संपूर्ण समाज त्यामुळे आनंदित झाला. निमड्या गावात जलपूजन व वृक्षारोपण माजी सरपंच मस्जिद निजाम तडवी, इरफान कुर्बान तडवी यांच्याहस्ते जल पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील वरिष्ठ मंडळी राजू पावरा, सुभाष बारेला, हरसिंग गोटा, तेरसिंग पावरा, महेश बारेला, कुर्बान तडवी यांची उपस्थिती लाभली.

गारखेडा या गावी जलपूजन व वृक्षारोपण प्रसंगी सरपंच रतन भंगी,जुवांसिंग पांडू,महेश हिरालाल, आकाश सुभाष,सुनील राजिराम,गिरासिंग बारेला,रमेश अनार सिंग बारेला,बिरासिंग बारेला,फुलसिंग बारेला,कस्तुराबाई बारेला यांच्या हस्ते करण्यात आले..

Protected Content