सिंधी कॉलनी परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुनील ऑइल मिल जवळील सिंधी कॉलनी परिसरातून एकाची ८० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून मिरची घटना समोर आली. याप्रकरणी सोमवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश कडू वानखेडे (वय-४३) रा. हनुमान नगर गणेशपुरी, भुसावळ हे प्रौढ व्यक्ती आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २९ ऑगस्ट रात्री साडेनऊ वाजता निलेश वानखेडे यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ डीझेड ४२९३) ही शहरातील सुनील ऑइल मिल जवळील सिंधी कॉलनी परिसरात सार्वजनिक ठिकाणी लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री ८० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता समोर आला. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर निलेश वानखेडे यांनी त्यांचा दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्यांना कुठेही दुचाकी मिळून आली नाही. अखेर त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता अज्ञात चोरट्यांवर भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस नाईक भूषण जैतकर आहे.

Protected Content