मुक्ताईनगरात गावठी पिस्तूलासह एकाला अटक

मुक्ताईनगर प्रतिनिधी । शहरातील भोईवाडा परिसरात बेकायदेशीर गावठी बनावटीचेच पिस्तूल घेवून फिरणाऱ्या संशयित आरोपीला मुक्ताईनगर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रवि उर्फ माया महादेव तायडे (वय-२५) रा. भाईवाडा मुक्ताईनगर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरातील भाईवाडा परिसरात रवि तायडे हा तरूण बेकायदेशीररित्या गावठी पिस्तूल घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती मुक्ताईनगर पोलीसांना मिळाली. पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे आणि पो.कॉ. सचिन जाधव यांनी संशयित आरोपीला रविवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील गावठी बनावटीचा पिस्तून हस्तगत केली आहे.  याप्रकरणी दुपारी ४ वाजता मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.

Protected Content