Home राजकीय खर्‍या बापाची औलाद असेल तर …. वडेट्टीवारांचे पडळकरांना चॅलेंज !

खर्‍या बापाची औलाद असेल तर …. वडेट्टीवारांचे पडळकरांना चॅलेंज !

0
43


मुंबई प्रतिनिधी | राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना जोरदार प्रत्युत्तर देत पुरावे देण्याचे बजावले आहे.

नागपूर: राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. या आरोपावर वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाबा रे तुला काय बोलायचं असेल तर पुराव्यानिशी बोल. बेछूटपणे काही आरोप करू नकोस. खर्‍या बापाची औलाद असेल तर आरोप सिद्ध कर. नाही तर आज तुला नोटीस देणार असल्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. पडळकरांवर ५० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. वास्तव गोष्टींवर आरोप करावेत. आता ते कार्यकर्ते राहिले नाहीत. आमदार झाले आहेत. एखाद्या मंत्र्यावर जबाबदारीने आरोप केले पाहिजेत. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाईल. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी, असं वडेट्टीवार म्हणाले. 

पडळकर यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करावे, पुरावे द्यावे, आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेल. माझ्या नावाने, माझ्या नातेवाईकांच्या नावे कुठलंही दारुचे दुकानं नाही. छत्तीसगडमध्ये कंपनी नाही. पडळकर खर्‍या बापाची औलाद असेल तर, तर त्यांनी आरोप सिद्ध करावे, असं आव्हानच त्यांनी दिलं. तर,  भाजपमध्ये जाणार नाही असं कुलदैवताची शपथ घेऊन पडळकर भर सभेत बोलले होते. त्याचं काय झालं?, असा सवालही त्यांनी केला. 


Protected Content

Play sound