उदयनराजेंच्या संपत्तीत तब्बल दीड कोटींची वाढ

327856 udayanraje bhosale

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकही होत आहे. या विधानसभा निवडणुकांच्या धामधुमीत सातारा लोकसभा मतदारसंघाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादीच्या उदयनराजे भोसले 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये साताऱ्यातून विजयी झाले. मात्र अवघ्या पाच महिन्यात त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. घड्याळ सोडत त्यांनी कमळ हाती घेतले आणि आता ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र या अवघ्या पाच महिन्यात उदयनराजेंच्या संपत्तीत तब्बल दीड कोटींची वाढ झाल्याचे शपथपत्रातून समोर आले आहे.

लोकसभा निवणुकीत उदयनराजे भोसले यांच्याकडे १३ कोटी ८१ लाखांची जंगम मालमत्ता होती. आता तित वाढ होऊन ती १४ कोटी ४४ लाखांपेक्षाही अधिक झाली आहे. उदयनराजेंकडे सोने आणि हिऱ्याचे दागिने. शिरटोप असे सुमारे ४० किलोचे दागिने आहेत. तसेच त्यांच्याकडे ऑडी, मर्सिडीज बेन्झ. इण्डेवर अशा कार आहेत. या बरोबरच त्यांच्याकडे १८५ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. यात जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. सुखवस्तू हा आपला व्यवसाय असल्याचे उदयनराजेंनी शपथपत्रात नमूद केले आहे. उदयनराजेंवर १ कोटी ८२ लाखांचे वाहन कर्ज देखील आहे. उदयनराजे यांच्या विरोधात उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्याकडे १० कोटींची जंगम, तर ११ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. श्रीनिवास पाटील यांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. श्रीनिवास पाटील यांच्या कुटुंबाकडे दागदागिने आहेत. तसेच कुटुंबाच्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूका आणि काही बँकांमध्ये ठेवीही आहेत. या बरोबरच मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीला ६० लाख रुपयांचे त्यांनी कर्ज दिल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content