मुख्यमंत्री पदासाठी नाही पण २०२४ ची निवडणूक बारामतीतून लढविणार -खा.सुप्रिया सुळे

नागपूर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नाही परंतु २०२४ ची लोकसभा निवडणूक बारामती मधूनच लढविणार असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी चंद्रपूर येथे एका कार्यक्रम प्रसंगी म्हटले आहे.

राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बलस्थान पक्के असून राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदारही तेच असून, मी केवळ पदासाठी कोणतेही काम करीत नसल्याचेही खा.सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. गेल्याच आठवड्यात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे, सर्व राष्ट्रवादी आमदारांना घेऊन नवस फेडीन असे देवीला साकडे घालणाऱ्या खा. सुळे यांनी म्हटले होते.

अपक्ष आमदारांची मुख्यमंत्री ठाकरे भेट घेणार आहेत, त्यापूर्वीच खा.सुप्रिया सुळे यांनी चंद्रपूर दौऱ्यात असताना त्यांनी अपक्ष आमदार किशोर जोर्गेवर यांची भेट घेत चर्चा केली. तर आमदार जयस्वाल यांनी कामांसाठी टक्केवारी मागितली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या परिसरात राजकीय चर्चेला वेगळेच उधाण आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!