मुख्यमंत्री पुन्हा सर्व आमदारांसोबत गुवाहटीला जाणार !

मुंबई -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या सर्व आमदारांना घेऊन गुवाहाटी गाठणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व 50 आमदारांसहित गुवाहाटीला जाणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि आपले सर्व 50 आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाऊन कामख्या देवीचे दर्शन घेणार आहे. एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी विशेष पूजा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कामाख्या देवीवर मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी श्रद्धा आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे आपल्या आमदारांसह गुवाहाटीला मुक्कामी होते. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे यांनी सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते.

Protected Content