ऋतुजा लटके यांच्या विजयाचा महापालिकेसमोर फटाके फोडून जल्लोष (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा पोटनिवडणूकीच विजय झाला आहे. या विजयचा महापालिकेसमोर रविवारी ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे फटाके फोडून विजयाचा जल्लोष करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने तेथे पोटनिवडणूक झाली होती. यात भाजपने उमेदवार न दिल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी घेण्यात आली. दरम्यान, या निवडणूकीत पंधराव्या फेरीच्या अखेर ऋतुजा लटके यांना ५५९४६ मते मिळाली व विजय मिळविला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पहिल्यांदा पोट निवडणूकीत ऋतूजा लटके यांचा दणदणीत विजय झाल्याने मशालीच्या चिन्हावर पहिले खाते ओपन केले आहे. या विजयाचा जळगाव शहरातील महापालिकेसमोरील मैदानात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

याप्रसंगी पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव पाटील, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, महानगराध्यक्ष शरद तायडे, गजानन मालपूरे, जाकीर पठाण, मनिषा पाटील, मंगला बारी, ज्योती शिवदे, प्रशांत सुरळकर, अमित जगताप, अमोल मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content