राहुल गांधींनी पदाचा राजीनामा दिल्याने पक्षावर संकट – खुर्शीद

salman khurshid

नवी दिल्ली प्रतिनिधी । काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राहुल गांधी यांनी जबाबदारीपासून पळ काढल्याचं आतापर्यंत दबक्या आवाजात बोललं जात होते. मात्र आता त्यावर पक्षाचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी उघडपणे वक्तव्य केले आहे. सर्वात मोठी समस्या म्हणजे आमचे नेतेच आम्हाला सोडून गेले आहेत. राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने पक्षासमोरील संकट वाढल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले होते. त्यावर पहिल्यांदाच पक्षाचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी जाहीर वक्तव्य केलं आहे. त्यांनी पक्षाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली असून, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने पक्षावर आणखी संकट वाढले आहे. आमचे नेते सोडून गेले हीच आमची मोठी समस्या आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षासमोरील संकट आणखी वाढलेलं दिसत आहे. हे पद सध्या सोनिया गांधी यांनी सांभाळलं आहे, असे खुर्शीद म्हणाले. राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा द्यायला हवा होता असे मला तरी वाटत नाही. त्यांनी अजूनही या पदावर राहायला हवं होते, असं मला तरी वाटते. ते या पदावर कायम राहावेत आणि नेतृत्व त्यांच्याकडे असावे असे कार्यकर्त्यांनाही वाटत होते. सोनिया गांधी यांनी हे पद सांभाळलं असलं तरी ती एक तात्पुरती व्यवस्था आहे, असंही ते म्हणाले.

Protected Content