पुण्यात पुरग्रस्तांकडून चंद्रकांत पाटलांविरोधात घोषणाबाजी

pune patil

पुणे प्रतिनिधी । पुण्यात आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असतांना अरणेश्वर चौकातील संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घालत त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अरणेश्वर येथील टांगेवाले परिसरातील संतप्त नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेधाच्या घोषणा देत ते केवळ या ठिकाणी फोटो काढण्यासाठी आले आहेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. टांगेवाले वसाहत येथे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे भिंत पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे संसार उद्ध्वस्त झाला आहेत. येथील संतप्त नागरिकांनी आज सकाळीच आंदोलनाचा पवित्रा घेत रस्ता अडवला होता. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांना बाजूला करत रस्ता खुला करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणची पाहणी केली. मात्र याप्रसंगी संतप्त नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवित त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Protected Content