खडकी बु येथे मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

school bags

चाळीसगाव, प्रतिनिधी | जीवन सुंदर आहे ते परिश्रमातून, अनुभवातून अधिक फुलवता येते. आपली परिस्थिती गरिबीची आहे, म्हणून खचून न जाता, परिस्थितीशी लढायला शिका, असे आवाहन युवा नेते मंगेश चव्हाण यांनी आज (दि.१७) केले. तालुक्यातील खडकी बु. भागातील दुवामहल परिसरातील जिल्हा परिषद उर्दू शाळेत आज मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी व्यासपीठावर उपसरपंच मुश्ताक खाटीक, माजी उपसरपंच मुराद पटेल, दयान खाटीक, रमजान खाटीक, अजय जोशी, भुषण पाटील, खुशाल पाटील, दीपक राजपूत, मुख्याध्यापक उपस्थित होते.

मंगेश चव्हाण पुढे म्हणाले की, संघर्षातून निर्माण झालेला माणूसच नवे विश्व निर्माण करू शकतो. कारण संकटांना पेलण्याची ताकद त्यांच्या अंगी असते. आपल्या गरिबीचा कधीही बाऊ करून घेऊ नका, या जगण्यावरही प्रेम करा. शिक्षण घेऊन पाहिलेल्या स्वप्नाचा पाठलाग करण्यापूर्वी त्या ध्येयाचा पाया भक्कम करून आकाशी झेप घ्या. शिका सरकारी अधिकारी व्हा, समाजाला तुमच्या सारख्या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे. कारण अशाच अधिकाऱ्यांनाच तळागाळातले प्रश्न समजतात. त्याचबरोबर आई-वडिलांचे चांगले आधार बना, आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व प्रचंड आहे, त्यामुळे खूप शिका.

विद्यार्थ्याचे मनोगत भावले :- यावेळी एका विद्यार्थ्यानेही आपली परिस्थिती मांडून मिळालेल्या दप्तराबद्दल आनंद व्यक्त केला. त्याचे मनोगतही उपस्थितांचे मन हेलावून गेले.

Protected Content