जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने दणाणली गोदावरी नगरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गगनभेदी नजर ज्याची, पहाडासमान विशाल काया, धगधगता सुर्यही झुकतो आणि वंदितो शिवराया.. अशा या स्वराज्य निर्माण करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्‍त गोदावरी फाऊंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजीचा गजर करण्यात आला.

गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्‍त सकाळी ९ वाजता महाविद्यालय परिसरात मिरवणूक काढण्यात आली. यात जिजाऊ, शिवाजी महाराजांची व्यक्‍तीरेखा साकारण्यात आली. संपूर्ण महाविद्यालय परिसर हा भगव्यांमुळे शिवमय होऊन गेला. पारंपरिक पेहरावात मुली तर मुलांनी देखील मावळ्यांची वेशभुषा साकारत शिवजयंती उत्सवात सहभाग नोंदविला. यात लेझीम पथकाद्वारेही सादरीकरण करण्यात आले. यानंतर किवा तेवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन महाराजांचा जयजयकार करण्यात आला. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या डॉ.मौसमी लेंढे, उपप्राचार्य मेनका एस पी, नर्सिंगचे संचालक शिवानंद बिरादर, रजिस्ट्रार प्रविण कोल्हे, मेट्रन संकेत पाटील यांच्यासह नर्सिंगचा संपूर्ण स्टाफ उपस्थीत होता. यावेळी विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करत हर हर महादेव अशा घोषणा देत महाविद्यालय परिसर दणाणून टाकला.

डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयातही शिवजयंतीनिमत्‍त पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.जयवंत नागुलकर, रजिस्ट्रार राहुल गिरी यांच्यासह स्टाफची उपस्थीती होती. विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला तसेच शिवरायांचा जयजयकारही करण्यात आला. शिवजयंती मिरवणूकीत विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवित हातात भगवे झेंडे घेत जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करुन संपूर्ण गोदावरी नगरीत जल्‍लौष केला.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातही शनिवार, १९ रोजी सकाळी शिवजयंतीनिमित्‍त भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्याहस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती करण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एच.पाटील, उपप्राचार्य प्रविण फालक, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, गोदावरी आयएमआर महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके, प्रा.हेमंत इंगळे, प्रा.ईश्‍वर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते.

शैक्षणिक संस्थांमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी 

गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव, डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल सावदा आणि भुसावळ, डॉ.उल्हास पाटील कृषी, कृषी अभियांत्रिकी, कृषी अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी, डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालय, डॉ.उल्हास पाटील संगीत महाविद्यालय, फॅशन टेक्नॉलॉजी, हरीभाऊ जावळे हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय याठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, सर्व स्टाफ, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केले, यावेळी रॅली, मिरवणूक, नाटिका सादर करुन शिवरायांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

 

 

Protected Content