मंगेश चव्‍हाण यांच्याहस्ते वलठाण धरणाचे जलपूजन

jalpujan

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील वलठाण धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पंचक्रोशीतील नागरिकांच्या आग्रहास्तव मंगेश चव्‍हाण यांच्‍या हस्ते तेथे जलपूजन करण्यात आले. या धरणाला गाळमुक्त करण्यासाठी मे महिन्यात योगदान दिलेल्या मंगेश चव्‍हाण मित्र परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

तालुक्यातील पाटणादेवी डोंगराच्‍या शिवारातील वलठाण धरण हे गेली ३५ वर्षे गाळाच्‍या विळख्यात असतांना गावकऱ्यांच्‍या मागणीला प्रतिसाद देत मंगेश चव्‍हाण यांनी स्वखर्चाने या धरणातून ४००० ट्रॅक्टर गाळ काढण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री व इंधनासाठी सहकार्य केले होते. या कामामुळे धरणाचा पाणी साठा वाढला असून गेल्या आठवडाभरापासून सूरु असलेल्‍या पावसामूळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने आठ ते १० गावांचा पाणीप्रश्‍न सूटला आहे.

गावकऱ्यांकडून कौतुकाची थाप
वलठाण धरण हे दरवर्षी १०० टक्के भरणारे धरण म्‍हणून प्रचलित होते, मात्र वर्षानुवर्षे साठणाऱ्या गाळामूळे ह्या धरणाची जलसाठ्याची क्षमता कमी झालेली होती. त्‍यामुळे गावकरी चिंतेत होते. हा मुद्दा मंगेश चव्‍हाण यांना कळताच त्‍यांनी गावकऱ्यांची भेट घेवून ह्या कामासाठी सहकार्य केले होते. १९७५ नंतर प्रथमच धरणाचा गाळ उपसला गेल्याने हे धरण पुन्हा भरले असून गावकऱ्यांनी चव्‍हाण यांचे कौतूक केले आहे.

या जलपूजनावेळी मार्केट कमेटी संचालक मच्छीन्द्रभाऊ राठोड, जिल्‍हा मध्यवर्ती बँक संचालक राजूभाऊ राठोड, ग्रा.स. ज्ञानेश्‍वर राठोड, पिंटू चव्‍हाण, नगरसेवक भास्‍कर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटे, माजी नगरसेवक निलेश राजपूत, प्रभाकर चौधरी, वि.का.सो. चेअरमन सुदाम पाटील, सरपंच अनिल नागरे, मनिष राठोड, सिताराम राठोड, आनंदा राठोड, कैलास सूर्यंवशी, पवन पाटील, अजय जोशी, सचिन दायमा, शांताराम पाटील, खूशाल पाटील, मनोज गोसावी, जगदीश चव्‍हाण, तुषार चव्हाण, भुषण पाटील, सुबोध वाघमारे व समस्त गांवकरी उपस्‍थित होते.

Protected Content