जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना होमीयोपॅथी औषधीचे वाटप

 

जळगाव, प्रतिनिधी । इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फ़े जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील समग्र शिक्षा अभियान अंतर्गात ८००० शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना रोग प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या आर्सेनीक होमीयोपॅथी या औषधीचे वाटप करण्यात आले.

कोरोना विषाणूच्या संकटावर मात करणेसाठी सर्वच स्तरावरून सर्वत्र प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थीतीत जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंन्द्राच्या वतीने दिव्यांग व्यक्तींकडे विशेष लक्ष पुरवले जात आहे. त्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करणे, दिव्यांग मुलांच्या पालकांचे समुपदेशन करणे, त्यांच्या गरजेनुसार पूर्तता करणे तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने अर्सेनीक अलबम-30 या होमीयोपॅथी औषधीचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील समग्र शिक्षा अभियान अंतर्गतचे सर्व तालुक्यातील ८००० शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्सेनीक अलबम-30 या होमीयोपॅथी औषधीचे वाटप करण्यात आले. समग्र शिक्षा अभियानचे तालुक्याचे प्रतिनिधी यांना इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी रक्तपेढीचे चेयरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सचिव अनिल कांकरिया, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे नोडल ऑफिसर जी. टी. महाजन प्रकल्प प्रमुख डॉ. अपर्णा मकासरे, अनिल शिरसाळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

Protected Content