अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोनाची लागण !

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीला ‘कोरोना’चा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोना वायरस दाऊदच्या घरापर्यंत पोहोचला आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीमध्ये कोरोनाची लक्षण आढळली होती. त्याच्या घरात काम करणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान, याआधी देखील दाऊद आजारी असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण पाकिस्तानकडून याची कोणतीच माहिती दिली गेली नव्हती.

Protected Content