यावल पोलीस कर्मचाऱ्याची कोरोनावर मात; सहकाऱ्यांनी केले स्वागत (व्हिडीओ)

यावल (अय्यूब पटेल)। “जीवाची पर्वा न करता इमाने ऐतबारे कर्तव्य पार पाडत असतांना कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने मला ग्रासले आणि मी कोरोना पॉझिटीव्ह झालो आणि ईश्वरावर विश्वास ठेवून अखेर मी कोरोनामुक्त झालो आणि आज पुन्हा समाजाच्या सेवेसाठी कामावर रूजू झालो”, लोकांनी या रोगाला न घाबरता निर्धास्तपणे रहावे, सावधगिरी बाळगावी, भीती बाळगू नये, अशी भावपुर्ण व आनंदायी प्रतिक्रिया यावल पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या भूषण महाजन या दबंग पोलीसाने ‘लाईव्ह ट्रेन्डस न्यूज’शी बोलतांना दिली.

येथील यावल पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी हे कोरोना संसर्गावर यशस्वी विजय मिळुन आज पुन्हा सेवेत रुजु झाल्याने त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांनी टाळ्या वाजवुन स्वागत केले. दरम्यान मागील महीन्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाने संपुर्ण परिसरात थैमान घातल्याने लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आले असता, या बंदोबस्ताच्या कामी यावल पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले भुषण चव्हाण आणी अनिल ढाकणे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती. या काळात भुषण चव्हाण हे आपले कर्तव्य बजावत असतांना त्यांना कोरोनाची लागण झाल्याने नाशिक येथील कोवीड-१९ सेन्टरला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते पण त्यांचे उपचार हे योग्य दिशेने झाल्याने त्यांना उपचारानंतर भडगाव तालुक्यातील काळनदा या गावी घरी होम क्वारंटाईन राहील्यानंतर अखेर आज ते यावल येथे आपल्या सेवेत पुनश्च रुजु झाले असता त्यांचा यावलचे पोलीस निरिक्षक अरूण धनवडे, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर, सहाय्यक फौजदार मुज्जफ्फर खान पठान, फौजदार अजीज शेख, पोलीस कर्मचारी संजय तायडे, नितिन चव्हाण, विजय वाढे, गोरख पाटील, नेताजी वंजारी, सिकंदर तडवी, सुशिल घुगे यांच्या सह सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे हार्दीक स्वागत केले. यावेळी भुषण चव्हाण यांनी आपल्यावरील ओढवलेल्या कोरोनाच्या कठीन प्रसांगातील कटुअनुभव सांगीतले. त्यांच्या सोबत बंदोबस्त कामी असलेले सहपोलीस कर्मचारी अनिल ढाकणे यांचेही याप्रसंगी ते बंदोबस्तावरून सुखरूप आल्याने स्वागत करण्यात आलेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1471231079723217/

Protected Content