रहिपुरी परिसरात अज्ञात चोरट्यांनी लांबवली शेतातून जनावरे

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रहिपुरी येथील शेतकरी आपल्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेली जनावरे मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने याबाबत मेहूणबारे पोलिस ठाण्यात आज फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, मुरलीधर हनुमंत गुंजाळ (वय-४८ रा. रहिपुरी ) ता. चाळीसगाव येथे आई, पत्नी, मुलगा व मुलगी परिवारासह वास्तव्यास आहेत. वडिलोपार्जित शेती असल्याने गुंजाळ हे शेती हा व्यवसाय करतात. रहिपुरी शिवारात शेती असल्याने शेतात जणावरांसाठी पत्र्याचा शेड आहे. त्यात जणावरे बांधलेली असतात. मात्र नेहमीप्रमाणे ८ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत मुरलीधर गुंजाळ हे काम करून घरी परतले. ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता शेतात गुंजाळ हे पोहोचल्यावर काय तर शेडमध्ये जणावरे नव्हती. एकाप्रकारे धक्काच त्यांना बसला. लगेच त्यांनी मेहूनबारे पोलिस ठाणा गाठून अज्ञात इसमाविरूध्द फिर्याद दाखल केली. फिर्यादेत १५ हजार रुपये किंमतीचे पांढऱ्या रंगाचा छोट्या शिंगाचा बैल, २० हजार रुपये किंमतीचे चॉकलेटी रंगाची मोठ्या शिंगाची गाय व १० हजार रुपये किंमतीचे चितकबर्या रंगाची वासरी असे एकूण ४५ हजार रुपये किंमतीची जणावरे चोरीस गेली आहे. चोरी गेल्यामुळे घरातील उदरनिर्वाहचे छत्रच हरपले आहे. त्यामुळे घराबरोबर परिसरात एकच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Protected Content