इंग्लिश टीचर वेल्फेअर असोसिएशन मार्फत महिला दिवस उत्साहात

एरंडोल प्रतिनिधी । इंग्लिश टीचर वेल्फेअर असोसिएशन मार्फत 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्ताने जिल्ह्यातील ९ इंग्रजी विषय शिक्षिकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम झूम ॲपवर ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्लिश टीचर वेल्फेअर असोसिएशन जळगाव चे अध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ होते. प्रमुख मान्यवर म्हणून असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रमोद आठवले तसेच असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या संगीता भोसले व सरला ढगे उपस्थित होत्या.

संत गाडगे महाराज विद्यालय भुसावळ येथील प्राध्यापिका मनीषा देशमुख, मिल्लत हायस्कूल जळगाव येथील शिक्षिका शेख मुसफेरा बी अब्दुल अहद, श्रीराम माध्यमिक विद्यालय मेहरूण येथील शिक्षिका प्रतिभा पाटील, डॉ.डी. एम. जैन माध्यमिक विद्यालय पारोळा येथील शिक्षिका वैशाली सावंत, श्री एन. टी. मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल, अमळनेर येथील शिक्षिका योगेश्वरी पाटील, माध्यमिक विद्यालय देवळी तालुका चाळीसगाव येथील शिक्षिका हेमलता नेवरे, राष्ट्रीय कन्या शाळा चाळीसगाव येथील शिक्षिका जयश्री बडे, न्यू आदर्श स्कूल पाचोरा येथील मुख्याध्यापिका  कल्पना पाटील, माध्यमिक विद्यालय पाळधी तालुका जामनेर येथील शिक्षिका अनिता पाटील इत्यादींचा मुलाखतीमध्ये समावेश होता.

सदर शिक्षिकांनी शिक्षिका होईपर्यंतचा त्यांचा प्रवास सदर कार्यक्रमांमध्ये श्रोत्यांसमोर मांडला. त्याचबरोबर स्त्री-पुरुष समानता निर्माण होण्याकरिता कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे यावर आपले विचार व्यक्त केले. संत गाडगे महाराज विद्यालय भुसावळ येथील प्राध्यापिका मनीषा देशमुख यांनी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले व संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमामुळे आज भारतातील स्त्री ही सक्षम झाली असल्याचे सांगितले. त्यामुळेच आपण एक यशस्वी शिक्षिका तसेच दुसऱ्यांदा एका गावाचे सरपंच होऊ शकलो अशी कबुलीही त्यांनी दिली.

असोसिएशनचे सचिव गणेश बच्छाव, सहसचिव टी.बी. पांढरे कार्यकारिणी सदस्य संजय बारी व असोसिएशनच्या सदस्या सपना रावलानी यांनी अतिशय रंजक प्रश्नांची गुंफण करत उपस्थित शिक्षिकांच्या मुलाखती घेतल्या. असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रमोद आठवले यांनी सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले यांचे स्री स्वातंत्र्याचे स्वप्न भारतीय संविधानाच्या माध्यमातून पूर्ण झाले असल्याचे नमूद केले. कार्यकारिणी सदस्या संगीता भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त करत येणाऱ्या काळात भारतातील स्री अधिक सक्षम होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.

कार्यकारिणी सदस्या सरला ढगे यांनी स्री जीवनावर हिंदी भाषेतून कविता सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत आणली.  जेंडर इक्वलिटी हे खूप मोठे आव्हान असून या समस्येकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ यांनी केले. तसेच स्त्री बद्दलचा सन्मान हा आपल्या आचरणातून व्यक्त झाला पाहिजे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. ‘बंड कर’ या शीर्षकाची स्री जीवनावर कविता त्यांनी सादर केली. असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य डी. बी. पाटील यांनी झूम ॲप वरील  कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळत मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण इंग्रजी भाषेतून झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे खजिनदार एम. आर. चौधरी, कार्यकारिणी सदस्य बी.एन. पाटील, रणजीत सोनवणे, प्रभावती बावस्कर, शंकर भामेरे, राहुल सोनवणे, योगेश सूर्यवंशी, वाय.टी. पाटील, प्रवीण मोरे, गणेश सूर्यवंशी, एम.आर.बुंदे, हेमकांत लोहार, मोहन चव्हाण इत्यादींनी परिश्रम घेतले.

Protected Content