जागतिक महिला दिन निमित्त जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  क्रीडा व युवक सेवासंचालनालय, मराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या मार्फत जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ व जळगाव जिल्हा साई सेवा महिला मंडळ यांचे सहकार्याने आयोजित जागतिक महिला दिन निमित्त श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे 9 मार्च, 2024 रोजी विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या

\स्पर्धेचे उदघाटन जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष श्री प्रशांत कोल्हे यांनी मैदानाचे पुजन श्रीफळ वाढवून केले. सदर स्पर्धेत महिलांचा 45 वर्षाआतील गट व 45 वर्षावरील गट असे दोन गटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, सदर स्पर्धेत 100 मी धावणे, 400 मी चालने, गोळा फेक थाळी फेक, बकेट वॉल, दोरीवरील उडया, संगीत खुर्ची स्केटींग या क्रीडा प्रकारांचा समावेा होता.

स्पर्धेचा पारीतोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा ग्राहक मंचाच्या न्यायाधिश छायाताई सपके, तर प्रमुख अतिथी म्हणून बालविश्व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा भारती चौधरी, पोलीस उपनिरिक्षक प्रीती दातार, त्वचा रोग तज्ञ डॉ. रती महाजन, पी.के. गुडवे विद्यालयाच्या मुख्याध्यापीका कांचन नारखेडे, स्वामी समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तनुजा मोती, साई सेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा जाधव, उपाध्यक्षा हेमलता हसवाल, सचिव सुरेखा बाविस्कर समाजिक कार्यकर्त्या बबीता पाटील, माजी नगर सेविका रंजना वानखेडे, क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, मॅरेथॉन पटु विद्या बेडाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी न्यायाधिश छयाताई सपर्क व भारती चौधरी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन व मार्ल्यापण करण्यात आले, त्यानंतर सर्व मान्यवर महिलांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

स्पर्धेचा निकाल
100 मी धावणे – प्रथम – संगिता प्रदीप सुर्यवंशी, व्दितीय – मनिषा सिध्दार्थ, तृतीय – प्रिया आनंदराव पवार, ममता संजय सपकाळे, कविता मनोज सोनार, अनिता राजेश शिरसाठ, 2) 400 मी. धावणे प्रथम –पुनम संजय पती, व्दितीय – माधुरी चेतन पाटील, तृतीय – पुजा संजय सोनवणे, प्रथम –छाया धनसिंग तायडे, व्दितीय – आसावरी वासुदेव जोशी, तृतीय – सुजाता निलेश कोतकर,
3) गोळा फेक – प्रथम – संगिता प्रमोद सुर्यवंशी, व्दितीय –सारीका पुरुषोत्तम पाटील, तृतीय – मनिषा सिध्दार्थ सोनवणे , प्रथम –दिप्ती गोपाळ पिंप्रीकर, व्दितीय – सुजाता निलेश कोतकर, तृतीय – सुरेखा नंदु भावसार
4) थाळी फेक – प्रथम – गायत्री रमेश जैन – व्दितीय –सपना अजित तडवी, तृतीय – शितल योगेश पाटील, प्रथम – कांचन सुनिल नारखेडे, व्दितीय – जयश्री बालमुकुंद माळी, तृतीय – रंजना विजय वानखेडे
5) बकेट बॉल- प्रथम – सुषमा सुभाष बरर्डे – व्दितीय – हेमलता उमेश पाटील, तृतीय – उर्मीला शार्दुल बावीस्कर, प्रथम –आशा विजय कुमार मौर्य, व्दितीय – सीमा राजु अग्रवाल, तृतीय – शारदा अनील गवळी
6) चमचा लिंबू – प्रथम –अनु संजय घडेकर , व्दितीय – राजश्री सागर पाटील, तृतीय – सुजाता पुरुषोत्तम धांडे, प्रथम – निता यतींद्र चौधरी, व्दितीय –अर्चना रविद्र तायडे, तृतीय – कीर्ती गिरीष सारडा,
7) दोरीवरील उडया- प्रथम – कवीता मनोज सोनार, व्दितीय – कामीनी युवराज धांडे, तृतीय – रतना सुरजीतसींग पाटील, प्रथम – अनिता गिरीष रत्नपारखी, व्दितीय – कामीनी विनोद पाटील, तृतीय – आरती अमित पाटील,

प्रत्येक गटातील प्रथम तीन विजयी स्पर्धकांना पारितोषिक
म्हणून भेट वस्तू व प्राविण्य प्रमाणपत्र देण्यात आले. या भेटवस्तू जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे यांच्या हस्ते तर प्राविण्य प्रमाणपत्र जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. उत्कृष्ठ आयोजनाबाबत जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाच्या कांचन नारखेडे, डॉ. कांचन विसपुते, डॉ. जयश्री माळी, शालीनी तायडे, विजया चौधरी, ममता शर्मा, श्वेता कोळी यांचा भेट वस्तु देवून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. कांचन विसपुते यांनी प्रास्ताविक जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे सचिव श्री. राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने यांनी केले. स्पर्धेत पंच म्हणून प्रा. इकबाल मिर्झा, गिरीष पाटील, निलेश पाटील, डॉ. रणजीत पाटील, नितीन पाटील, प्रा. हरीष शेळके, प्रा. समिर घोडेस्वार, संजय मोती, विजय विसपूते , जितेद्र विसपुते, योगेश सोनवणे, जितेंद्र सोनवणे, धिरज जावळे, पंकज वराडे, सत्यनारायण पवार, कीयार सिं बारेला, मनोज वाघ, अनंत सोनवणे, यांनी काम पाहिले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी निर्मला जाधव, जयश्री फिरके, सविता महाजन, कीरण भंडारी, मोहिनी चौधरी क्रीडा मार्गदर्शन मिनल थोरात व राजेंद्र चव्हाण तसेच संकुल कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, या प्रसंगी महिलांसाठी सकेटींग, कराटे व ॲरोबीक्सचे प्रशिक्षण घेण्यात आले, स्पर्धेत बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला होता. प्रवेशाव्दारे व मैदान परीसर रंगीबेरंगी रांगोळया काढून सुशोभीत करण्यात आला होता. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून सर्व महिलांकरीता अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. असे जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव यांनी केले आहे.

Protected Content